ठाण्यात पुण्याच्या धर्तीवर उभारणार पत्रकार भवन : महसूल मंत्री बावनकुळे
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी मंजूर
ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी गावदेवी मैदानाशेजारील भूखंड देण्याची ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर करीत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत. पुण्याच्या धर्तीवर ठाण्यात भव्य पत्रकार भवन उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ठाण्यातील गावदेवी मैदानाजवळील 300 चौरस मिटर जागा ही तत्कालीन जिल्हा पत्रकार संघ आणि विकासकाने गैरव्यवहार आणि शर्तभंग केल्यामुळे राज्य शासनाने ताब्यात घेतली आहे. सदरची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी गुरुवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखीस्वरूपात केली. ही मागणी मंजूर करीत नामदार बावनकुळे यांनी येत्या पंधरा दिवसात पुण्याच्या धर्तीवर भव्य पत्रकार भवनाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पुढील कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांना पत्रकार भवनाच्या माध्यमातून मोठी सोय होणार आहे.
यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, माजी अध्यक्ष कैलाश म्हापदी, कार्याध्यक्ष दीपक शेलार, सेक्रेटरी राजीव डाके, खजिनदार राजा शेटकर, कार्यकारणी सदस्य अमर राजभर, निकेश शार्दुल, गजानन हरिमकर, नितीन दूधसागर, सारिका साळुंखे, प्रफुल्ल गांगुर्डे, सचिन देशमाने, ज्येष्ठ छायाचित्रकार किस्तु फर्नांडिस, ज्येष्ठ पत्रकार अनिल शुक्ला, गणेश भोईटे आदी पत्रकार उपस्थित होते.तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन पत्रकार भवनासाठी जागा आणि त्यासंबंधीची माहिती देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने हे उपस्थित होते.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
राज्यातील कामगारांना मिळणार दर्जेदार उपचार!
10 Sep 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम
10 Sep 2026
घरच्यांच्या धाडसामुळे गर्भावातीचा जीव वाचला
10 Sep 2026
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित
10 Sep 2026