एस. एस. मोबाईल शॉपीत लॅपटॉप लाँचिंग सोहळा
कोल्हापूर : एस. एस. मोबाईल शॉपीत लॅपटॉपचे लाँचिंग केले. शेजारी रामदास कुराडे, अमित कुराडे, यश कुराडे व पदाधिकारी.गडहिंग्लज शहरातील सुभाष विरमंदिरजवळ असलेल्या एस. एस. मोबाईल शॉपीमध्ये ॲपल, सॅमसंग, एचपी आणि लेनोवो या नामांकित कंपन्यांच्या लॅपटॉपचे लाँचिंग उत्साहात पार पडले. या लॅपटॉप लाँचिंग सोहळ्याचे उद्घाटन केले.
अमित कुराडे आणि यश कुराडे या दोन बंधूंनी सुरू केलेल्या एस. एस. मोबाईल शॉपीमध्ये जागतिक स्तरावर ओळख असलेल्या ॲपल, सॅमसंग, एचपी आणि लेनोवो या कंपन्यांच्या लॅपटॉपची उपलब्धता ग्राहकांसाठी सादर करण्यात आली. उपविभागातील ग्राहकांना विविध नामांकित ब्रँडचे लॅपटॉप एकाच ठिकाणी पाहण्याची आणि आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.यावेळी प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवाडे, गटनेते नरेंद्र भद्रापूर, बांधकाम सभापती रामगोंडा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. रामदास कुराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
एकांगी नव्हे तर तटस्थ, समग्र अभ्यासक्रमाची गरज : सहसरकार्यवाह अतुल लिमये
16 Oct 2026
सेवासंकल्प अभियानांतर्गत मुरबाड येथे तालुकास्तरीय शिबिर संपन्न!
16 Oct 2026
आगरी समाज संस्थेच्या ‘रूढी–परंपरा परिसंवाद’ मालिकेचा शुभारंभ उत्साहात संपन्न
16 Oct 2026