सेवासंकल्प अभियानांतर्गत मुरबाड येथे तालुकास्तरीय शिबिर संपन्न!
पालघर : सेवासंकल्प अभियानांतर्गत मा. जिल्हाधिकारी, ठाणे, उपविभागीय अधिकारी, कल्याण व तहसीलदार, मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने मुरबाड येथील कुणबी भवन येथे आयोजित तालुकास्तरीय शिबिर माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, विविध शासकीय दाखले तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. शासकीय सेवा आणि आरोग्यविषयक सुविधांचा लाभ नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी नागरिकांनी अशा शिबिरांच्या माध्यमातून शासनाच्या सुविधांचा मोठ्याप्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार अभिजित देशमुख, पोलीस निरीक्षक सचिनजी हुंदळेकर, राठोड, उल्हासभाऊ बांगर, रामभाऊ दळवी, किसनजी गिरा. दीपक पवार, जितेंद्र भावार्थे, नगराध्यक्ष मोहन गडगे, प्रकाश पवार, अनिल घरत, सुरेश बांगर सर, मोहन भावार्थे, मोहन सासे, संतोष पवार, लक्ष्मण घागस तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक